⚡सावंतवाडी ता.१६-: राज्यस्तरीय अॅबॅकस स्पर्धेसाठी स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल मधून एकूण बारा विद्यार्थी समाविष्ट झाले होते. बुद्धिमत्तेला चालना देणाऱ्या या स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी इयत्ता पाचवीतील ‘ कु. हेरंभ नाटेकर’ या विद्यार्थ्याने राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त केला.
तर, इयत्ता तिसरीतील ‘ कु. अद्वैत काळसेकर’ व इयत्ता चौथी मधील ‘ कु. माझमोहम्मद पटेल’ या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावर पाचवा क्रमांक प्राप्त केला. तसेच, स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना रजत पदक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना गुरुश्री अॅबॅकस अकादमीच्या ‘श्रीयुत भिसे’ सर यांचे मार्गदर्शन लाभले. त्याचप्रमाणे, स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या पथकाला सहा. शिक्षिका सौ. ग्रिष्मा यांचे मार्गदर्शन लाभले. वरील परीक्षेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे शाळेचे संस्थापक श्री. रुजुल पाटणकर व मुख्याध्यापिका सौ. दिशा कामत यांनी भरभरून कौतुक केले व विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
