बबन साळगावकर यांच्या विरोधात हल्ला करण्यासाठी रचलेल्या कट बाबत सखोल चौकशी करा…

माजी नगरसेवकांची मागणी: सावंतवाडी पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर..

⚡सावंतवाडी ता.१६-: सावंतवाडी ते आंबोली रस्ता दुरुस्ती व नुतनीकरण या कामाबाबत झालेल्या भष्ट्रचाराविरोधाततक्रार करुन संबंधित कामाच्या चौकशीची मागणी करण्यात आल्यानंतर संबंधित भ्रष्टाचारात गुंतलेल्या ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्या कडून प्राणघातक हल्ला करुन दुखापत करणेबाबत एकत्रित जमून प्राणघातक हल्ल्याचा कट रचण्यात आला याची चौकशी करण्याची मागणी माजी नगरसेवक व नागरिकांनी पोलीस निरीक्षकांकडे केली.

सावंतवाडी ते आंबोली घाटमार्ग रस्ता दुरुस्ती व नुतनीकरण या कामाबाबत झालेल्या भ्रष्टाचाराविरोधी तक्रार करुन त्यासंदर्भात चौकशीची मागणी करण्यात आल्यानंतर संबंधित भ्रष्टाचारात गुंतलेल्या ठेकेदार व सार्व. बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून प्राणघातक हल्ला करुन दुखापत करणेबाबत एकत्रित जमून प्राणघातक हल्ल्याचा कट रचण्यात आला.


सावंतवाडी येथील एक ठेकेदार यांच्या प्लाटवर सुमारे १० दिवसांपूर्वी जेवणावळ करून त्या ठिकाणी प्राणघातक हल्ल्याचा कट शिजविण्यात आला. माजी नगराध्यक्ष . बबनराव साळगांवकर यांच्यावर हल्ला करणेबाबत प्रत्येकावर जबाबदारी सोपविण्यात आली. त्यावेळी झालेली चर्चेमध्ये काही ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी या कार्यालयाचा एक अधिकारी यांनी हा प्राणघातक हल्ला करण्याचा प्लान तयार केला. याबाबत आपण सखोल चौकशी करून संबंधित हल्लेखोरांना जनतेच्या समोर आणावे, तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करुन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत. असे या निवेदनात म्हटले आहे यावेळी माजी नगरसेवक विलास जाधव सुरेश भोकटे उमेश कोरगावकर उमाकांवर सुंदर गावडे बावतीस फर्नांडिस सुधीर पराडकर उपस्थित होते

You cannot copy content of this page