जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत स्पृहा दळवी प्रथम…

⚡दोडामार्ग ता.१५-:
वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस आयोजित “मोबाईल हटवा बालपण वाचवा” जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत दोडामार्ग केंद्रशाळा नं १ च्या इयत्ता पहिलीतील स्पृहा सुमित दळवी हिने प्रथम क्रमांक पटकावला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातून इयत्ता पहिली ते सातवी गटात २१ स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते.या मध्ये द्वितीय क्रमांक शमिका आरावंदेकर कुडाळ हायस्कुल तृतीय क्रमांक प्रनोती राऊळ गजानन विद्यालय पाल तर उत्तेजनार्थ यज्ञेश शिंदे नेमळे हायस्कुल यांनी पटकावला स्पर्धेचे परीक्षण खानोलकर सर व तुळसकर मॅडम यांनी केले या स्पर्धेचे पारितोषिक वितरण २१ जानेवारी रोजी अश्वमेध महोत्सवात होणार आहे
स्पृहा दळवी हिला केंद्रशाळा दोडामार्ग नं १ या शाळेतील शिक्षकांचे तसेच तिच्या पालकांचे मार्गदर्शन मिळाले इयत्ता पहिलीतील स्पृहा ने मिळवलेल्या यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे

You cannot copy content of this page