⚡बांदा ता.१४-: श्री मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्ट संचलित मडूरा व्ही.एन नाबर प्रशालेत 22 वा स्नेहसंमेलन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकचे संचालक विद्याधर परब, किनळे सरपंच दीपक नाईक, मडुरा सरपंच उदय चिंदरकर, लोकल कमिटी चेअरमन भिकाजी धुरी, शशिकांत पित्रे, भाऊ वळंजू, पी टी ए उपाध्यक्षा सानिका गावडे, मडुरा उपसरपंच बाळू गावडे, लोकल समिती सदस्य सुरेश गावडे, प्रकाश वालावलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्याध्यापिका नीती साळगावकर यांनी प्रास्ताविकातून स्नेहसंमेलनाचा आढावा सादर केला. त्यानंतर सहशिक्षिका तेजस्वी गावडे यांनी 2023 व 24 चे अहवाल वाचन केले. मुलांनी केलेल्या हस्तलिखिताचे अनावरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाले. विद्यार्थी यशवंत परब याने हस्तलिखिताचे प्रास्ताविक केले. चालू वर्ष 2023 व 24 मधील ठळक घडामोडीचे पीपीटीद्वारे सादर करण्यात आले. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले. कार्यक्रमांमध्ये लोकनृत्य, कोळी नृत्य, पथनाट्य, भाषणे, गायन, नाटक व असे अनेक नृत्यांचे प्रकार सादर केले.
कार्यक्रमास मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक, पालक, ग्रामस्थ, पत्रकार आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन सहशिक्षिका वेलांकनी रोड्रिक्स तर आभार सहशिक्षिका प्रतीक्षा शिरोडकर व प्राची परब यांनी मानले.
मडुरा नाबर शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात…
