गद्दाराना धडा शिकविण्यासाठी कामाला लागा:खा राऊत यांच्या उबाठां सेनेच्या पदाधिकाऱ्यांना सूचना..
⚡सावंतवाडी ता.१३-: गद्दारांना धडा शिकवायचा आहे. कामाला लागा, 15 फेब्रुवारी पर्यंत आचारसंहिता लागणार, अशा सूचना खासदार विनायक राऊत यांनी आज येथे उपस्थित पदाधिकाऱ्यांना केल्या. दरम्यान, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचा खासदार विनायक राऊत यांनी आढावा घेतला यावेळी ते उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत होते.
यावेळी खासदार राऊत म्हणाले की निवडणुका जवळ आल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत आपल्याला ही जागा जिंकायची आहे. त्यामुळे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून आपण पाच वर्षात केलेले काम पटवून सांगा. काहीजण निवडणुकी डोळ्यासमोर ठेवून खोटी आश्वासन देतील. त्यामुळे अशा भूलथापांना बळी न पडता उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभे रहा ,असे आवाहन तुम्ही जनतेला करा असं सूचना देखील विनायक राऊत त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिल्या.
