सावंतवाडी शहरातील सांडपाण्याचा प्रश्न मिटणार…

मंत्री दिपक केसरकर; पायलट प्रोजेक्ट म्हणून महाराष्ट्रात शहराची निवड..

⚡सावंतवाडी ता.१४-: शहरातील सांडपाण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असून महाराष्ट्रात पहिले पायलट प्रोजेक्ट म्हणून सावंतवाडी शहराची निवड झाली आहे त्यामुळे लवकरच नद्यांमधून स्वच्छ पाणी वाहताना दिसणार आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिली तर सावंतवाडीच्या विकासामध्ये पत्रकारांचे योगदान खूप महत्त्वाचे आहे त्यांनी दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी वेळोवेळी करण्यात आली त्यामुळे पत्रकार आणि सावंतवाडीचे नाते हे स्वार्थ पलीकडचे आहे असेही केसरकर म्हणाले.


सावंतवाडी जिमखाना मैदानावर माजी नगरसेवक आणि पत्रकार यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते या सामन्याला शुभेच्छा देण्यासाठी मंत्री की सरकार आले असता ते बोलत होते.
पुढे म्हणाले सावंतवाडी शहरामध्ये विकासाला सुरुवात केल्यानंतर वेळोवेळी पत्रकारांनी केलेल्या सूचनांचे पालन करण्यात आले त्यामुळे सावंतवाडी शहर आणि पत्रकार यांच्यामध्ये एक वेगळे नाते आहे स्वार्थपलीकडे हे नाते आजपर्यंत जपण्यात आले असून शहराच्या विकासामध्ये पत्रकारांचाही तेवढाच वाटा आहे. त्यामुळे हे नाते यापुढे असेच घट्ट राहावे. दुसरीकडे सावंतवाडी शहरात पाण्याचा भेडसावणारा प्रश्नही लवकरच मार्गी लागणार आहे तर शहरातील सांडपाण्याचा प्रश्न लक्षात घेता तो सोडवण्यासाठी पहिले प्रोजेक्ट म्हणून सावंतवाडी शहराची निवड संपूर्ण महाराष्ट्रातून करण्यात आली आहे त्यामुळे लवकरच शहरातील हा प्रश्न मिटणार असून जवळच्या नद्यांमध्ये स्वच्छ पाणी वाहताना दिसणार आहे. यामुळे नागरिकांच्या करात काहीशी वाढ होणार आहे.
यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर माजी नगरसेवक विलास जाधव उमाकांत वारंग विलास जाधव अप्रोच राजगुरू शिप्रा सावंत सुरेश भोगटे ज्येष्ठ पत्रकार अण्णा केसरकर अभिमन्यू लोंढे संतोष सावंत सावंतवाडी पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लबचे जिल्हाध्यक्ष अनंत जाधव प्रवीण मांजरेकर राजू तावडे वैशाली खानोलकर नंदू मोरजकर विनायक गांवस अमोल टेमकर भवन नाईक आनंद धोंड शैलेश मयेकर रुपेश पाटील विजय देसाई राजेश नाईक प्रवीण परब जतीन भिसे रुपेश हिराप राजाराम धुरी संतोष मुळीक मयूर चराटकर प्रशांत मोरजकर संजय पिळणकर लक्ष्मण आवाड, पालिका कर्मचारी भाऊ भिसे दीपक मापसेकर गजानन कुडपकर गजानन परब निखिल कांबळे महेश सावंत आधी उपस्थित होते

You cannot copy content of this page