10 हजार पैकी 7340 जण मुलाखतीला सामोरे; भविष्यातही मुलांच्या हाताला रोजगार मिळण्यासाठी कटिबद्ध;विशाल परब..
⚡सावंतवाडी ता.१२-: विशाल परब आयोजित सिंधू रत्न जॉब फेअर मधून तब्बल 4829 मुला मुलींना प्रत्यक्ष जागेवर नोकऱ्या मिळाल्याने नोकरीसाठी आलेल्यांच्या चेहऱ्यावर हसु खुलले. तर 2511 जणांना जॉब कार्ड चे वाटप करण्यात आले एकूण दहा हजार ऑनलाईन नाव नोंदणी पैकी 7340 मुले मुलाखतीला सामोरे गेली एकूणच या जॉब फेरला रत्नागिरी आणि सिंधुदुर्गतील मुला-मुलींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सावंतवाडी जिमखाना मैदानावर आज भाजपाचे युवा नेते तथा महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष विशाल परब यांनी सिंधू रत्न जॉब फेअर च्या माध्यमातून बेरोजगार युवक युवतींनी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली होती. सकाळपासूनच ठिकाणी रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून मोठ्या प्रमाणात युवक युवती नोकरीसाठी आपल्या शैक्षणिक कागदपत्रांसह दाखल झाल्या होत्या या ठिकाणी शंभरहून अधिक कंपन्या उपलब्ध होत्या. श्री परब यांनी या जॉब फेअर चे नीटनेटके आयोजन केल्याने शैक्षणिक पात्रतेनुसार त्या त्या संबंधित कंपनीच्या ठिकाणी नोकरीसाठी आलेल्या मुलाखती देण्यास पाठवण्यात आल्या सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातून जवळपास दहा हजार 312 जणांनी ऑनलाइन नाव नोंदणी केली होती त्यापैकी 8853 जण प्रत्यक्षरीत्या हजर राहिल्या त्यातील 7340 मुला-मुलींनी प्रत्यक्ष मुलाखती दिल्या यातून 4829 जणांना प्रत्यक्षरीत्या लोकरीचे वाटप करण्यात आले दीड लाख ते अडीच लाखापर्यंत वार्षिक पॅकेटच्या नोकऱ्या यावेळी मुलांना मिळाल्या त्यांचे नियुक्तीपत्रही मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले एकूणच नोकरी प्राप्त होतच अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला. या ठिकाणी आलेल्या काहींना नोकरी पासून दूर राहावे लागले परंतु अशा 2511 मुला मुलींना जॉब कार्ड चे वाटप हे करण्यात आले त्यामुळे भविष्यातही त्यांना नोकरीची संधी या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.
दरम्यान विशाल परब यांच्या सौभाग्यवती सौ वेदिका परब माजी आमदार प्रमोद जठार यांनीही मेळाव्याला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या त्यांच्या हस्ते नियुक्ती झालेल्यांना नियुक्तीपत्रे वाटप करण्यात आले.
