⚡सावंतवाडी ता.१२- : श्री प. पू. वासुदेवानंद सरस्वती (टेंबेस्वामी महाराज) यांनी स्थापन केलेल्या सावंतवाडी भटवाडी येथील श्री दत्त मंदिर येथे श्री स्वामी महाराजांनी स्थापन केलेल्या पादुकांचा १३५ वा वर्धापनदिन १५ जानेवारी रोजी साजरा होणार आहे.
त्या निमित्त रात्री ८ वाजता झी मराठीच्या २००९ च्या प्रथम सत्रातील सारेगमप लिटल चॅंपमधे अंतिम फेरी पर्यंत पोहोचलेल्या, विशेष श्रेणीत संगीत विशारद झालेल्या डॉ. अल्का देव मारुलकर यांच्या शिष्या कुडाळ येथील सौ. नेहा करमरकर – कुलकर्णी यांच्या संगीतसेवेचा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यांना तबलासाथ सिध्देश कुंटे (कुडाळ) करणार असून संवादिनीसाथ सौ वर्षा निगुडकर (कसाल) करणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन संजय कात्रे करणार आहेत. संगीतप्रेमीनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
