अप्पासाहेब पटवर्धन चौकातील व्यापारी मार्केटबाबत केली चर्चा..
⚡कणकवली ता.०६-: २० जानेवारी २०२४ रोजी जुना भाजी मार्केट व्यापारी मित्र मंडळ ( अप्पासाहेब पटवर्धन चौक, कणकवली) येथील श्री सत्यनारायणाच्या महापुजेच्या निमित्ताने आयोजित नानाविध कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांना निमंत्रण देण्यात आले.
पत्रकार दिनाच्या निमित्ताने
माऊली मित्र मंडळ व सलग्न सर्व मंडळाचे संस्थापक राजेंद्र मनोहर पेडणेकर आणि मित्र मंडळाचे अविनाश गावडे, बाबुराव घाडिगावकर, प्रभाकर कदम यांनी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांची भेट घेतली.
ओरोस येथील पत्रकार भवनात उपस्थित राहून बाळशास्त्री जांभेकर” यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार भवनामध्ये असलेल्या पुतळ्याला पुष्पहार, पुष्पांजली अर्पण करण्यात आली .
यावेळी जिल्हा व्यापारी महासंघाचे, कणकवली तालुकाध्यक्ष दिपक बेलवलकर व मंडळाचे सदस्य उपस्थित होते
यावेळी पेडणेकर यांनी दिपक बेलवलकर व मंडळाचे सदस्य यांच्या उपस्थितीत अप्पासाहेब पटवर्धन चौकातील व्यापारी मार्केट नव्याने बांधकाम करण्यात संदर्भात चर्चा केली.पालकमंत्री यांनी आमंत्रणाचा स्विकार करून, उपस्थितीत राहून, त्यावेळी संपूर्ण व्यापारी मार्केटची पहाणी करु व योग्य ते सहकार्य करण्याचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांना आश्वासित केले.
