नमो चषकसाठी भाजयुमोतर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कॉलेज निहाय नाव नोंदणी शिबिर…

⚡कणकवली ता.०५-: भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा यांच्यातर्फे नमो चषक २०२४ चे आयोजन राज्यभर करण्यात येत असून त्यानुसार , सिंधुदुर्ग जिल्हा युवा मोर्चातर्फे तालुकास्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये कबड्डी, फुटबॉल, खो खो, व्हॉलीबॉल, क्रिकेट, बॅडमिंटन, कॅरम, रस्सीखेच, बुद्धीबळ, धावणे १०० व ४०० मी., पुरुष व महिला कुस्ती तसेच चित्रकला, रांगोळी, गीतगायन, नृत्य, एकांकिका, वर्तुत्व अशा स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धा २५ जानेवारी या कालावधीत होणार आहेत. क्रिकेट, मॅरेथॉन, रांगोळी या स्पर्धा जि. प. गटनिहाय होणार आहेत. व्हॉलीबॉल, कॅरम, बुद्धीबळ, बॅडमिंटन, खो खो या स्पर्धा तालुकानिहाय होणार आहेत. १५ हजार स्पर्धकांची नोंदणी करण्यात येणार असून अधिक माहितीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांनी केले आहे.

यावेळी कणकवली येथे नोंदणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, युवा मोर्चा सरचिटणीस संतोष पुजारे, मेघा गांगण, अण्णा कोदे, चिटणीस गणेश तळगावकर , सान्वी गावडे, शहराध्यक्ष सागर राणे, यश सावंत, रोहित ठाकूर, सागर राणे, उपस्थित होते.

You cannot copy content of this page