साटेली गावातील मायनिंग प्रकल्प त्वरित बंद करा अन्यथा आंदोलन…

ग्रामस्थांनी घेतली प्रांत अधिकाऱ्यांची भेट; मायनिंगमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान..

⚡सावंतवाडी ता.०४५-: येथील साटेली उर्फ सातार्डा गावातील अनधिकृत मायनिंग उत्खनन व मायनिंग साठा वाहतूक बंद करण्यात यावे अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांच्या वतीने आज प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदनद्वारे केली आहे.

दरम्यान गावात मायनिंग प्रकल्प आल्याने गावात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. त्यामुळे हे मायनिंग त्वरित बंद करण्यात यावे अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी त्यांनी निवेदनद्वारे प्रांताधिकारी यांना दिला आहे.

यावेळी विलास साटेलकर,मीनल साटेलकर ,विकास साटेलकर, रेश्मा साटेलकर, भारती कुबल, सुनिता कांबळी, अस्मिता नाईक, सुनिता नाईक,मधुकर नाईक, नंदकिशोर झारापकर, आनंद नाईक ,प्रशांत साटेलकर, भालचंद्र नाईक, दत्ताराम कलंगुटकर ,कृष्णा कलंगुटकर, अशोक साटेलकर,अविनाश साटेलकर,प्रकाश साटेलकर,सुनील कांबळी,संजय कांबळी,आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page