⚡कुडाळ ता.०१-: नवराष्ट्र सन्मान सोहळा रत्नागिरी-सिंधुदुर्ग २०२३ नुकताच रत्नागिरी येथे पार पडला. या सोहळ्यात राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते विविध क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक व्यक्तींना नवराष्ट्र आदर्श उद्योजक पुरस्कार देण्यात आले आहेत.
यामध्ये सिंधुदुर्ग कुडाळ तालक्यातील बाव येथील उद्योजक अरविंद करलकर यांना आदर्श उद्योजक पुरस्काराने गौरविण्यात आले. यामुळे अरविंद करलकर यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.
