⚡कणकवली ता.०१-: बॅ. नाथ पै यांच्या जीवनचरित्राचे व कार्याचे परिशिलन उमलत्या वयातील विद्यार्थ्यांकडून व्हावे, त्यातून त्यांनी प्रेरणा घ्यावी या हेतूने नगर वाचनालय कणकवलीतर्फे बॅ. नाथ पै वक्तृत्व स्पर्धा सामाजिक कार्यकर्ते स्व. आनंद आळवे यांनी केलेल्या आर्थिक नियोजनातून आयोजित केलेली आहे.
सदर स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित असून इयत्ता आठवी ते दहावीत सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विनाशुल्क आहे.
सदर स्पर्धा शनिवार २७ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ८.३० वाजता अप्पासाहेब पटवर्धन सभागृह, नगर वाचनालय कणकवली येथे संपन्न होईल.प्रत्येक स्पर्धकास कमीत कमी पाच मिनिटे व जास्तीत जास्त सात मिनिटांची अंतिम मर्यादा असेल.
या वक्तृत्व स्पर्धेसाठी १) समाज व्यवस्थेला नाथ पै यांच्या विचारांची गरज २) आजची परीक्षा पध्दती व गुणवत्ता असे दोन विषय यांपैकी कोणत्याही एका विषयावर मराठी भाषेतून स्पर्धकाने आपले विचार मांडावयाचे आहेत. प्रत्येक स्पर्धकाने आपल्या विषय मांडणीचे टिपण स्पर्धेच्या दिवशी आयोजकांकडे अगोदर सदर करणे आवश्यक आहे.प्रत्येक सहभागी स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल.
प्रथम क्रमांक,व्दितीय व तृतीय क्रमांकास अनुक्रमे रूपये १०००,७००,५०० पारितोषिक तर उत्तेजनार्थ क्रमांकास रोख रक्कम १५०/-पारितोषिक ठेवण्यात आले आहे.प्रशालेतील फक्त दोन विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभाग घेण्यास उद्युक्त करून त्यांचे स्पर्धा प्रवेश अर्ज २३ जानेवारी पर्यंत ग्रंथपाल, नगर वाचनालय, मु.पो.ता. कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग ४१६६०२ येथे पाठवावेत.
अधिक माहितीसाठी मोबाईल नं.९०७५८७८९८७ अथवा ९८६०६९८८४५ यावर संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे.
