⚡मालवण ता.३१-: देवबाग येथील डॉ. दत्ता सामंत इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन व सुवर्ण महोत्सवी वर्ष सांगता समारंभ दि. ८ ते १० जानेवारी रोजी होणार आहे.
यानिमित्त दि. ८ जानेवारी रोजी सायं. ४ वा. सत्यनारायण महापूजा, ६ वा. सुश्राव्य भजन- सादरकर्ते : रामकृष्ण हरी बाल भंजन सेवा संघ, तेंडोली, ७.३० वा. सुगम संगीत- सादरकर्ते : अष्टपैलू कलानिकेतन, मालवण, दि. ९ रोजी सायं. ७ वा. हस्तकला व रांगोळी प्रदर्शन पारितोषिक वितरण होणार असून यावेळी अध्यक्ष- देवबाग सरपंच उल्हास तांडेल, माजी विद्यार्थीनी तथा तारकर्ली सरपंच मनाली मयेकर उपस्थित राहणार आहेत. तसेच शालेय विद्यार्थ्यांचे करमणुकीचे कार्यक्रम होणार आहेत. दि. १० रोजी सायं. ७ वा. पारितोषिक वितरण, सत्कार समारंभ, ताम्रपत्र वितरण कार्यक्रम होणार आहे. यावेळी उद्योजक गणेश सामंत, माजी खासदार नीलेश राणे, ऍड. समीर गवाणकर, देवबाग सरपंच उल्हास तांडेल, तारकर्ली सरपंच मनाली मयेकर उपस्थित राहणार आहेत. यावेळी माजी विद्यार्थ्यांचे करमणुकीचे कार्यक्रम होणार आहेत. तरी सर्व आजी – माजी विद्यार्थी, हितचिंतक, पालक यांनी या समारंभात सहभागी व्हावे, असे आवाहन अखिल देवबाग विकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष भूषण सामंत, मुख्याध्यापिका सौ. रचना खोबरेकर, शाळा व्यवस्थापन समिती, शालेय स्वराज्य सभा प्रतिनिधी यांनी केले आहे.
