⚡कणकवली ता.२७-: कणकवली नगरपंचायत कार्यक्षेत्रात “विकसित भारत संकल्प यात्रा” अभियान रथाचे आगमन शुक्रवार 29 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 9 ते 12 वाजता पटर्वधन चौक येथे होणार आहे.
यावेळी केंद्र शासनाच्या पी.एम.स्वनिधी, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री उज्वला गॅस, आयुष्यमान कार्ड शिबिर, मुद्रा लोन योजना, आधारकार्ड अद्यावत करणे यासारख्या विविध योजनेची माहिती व लाभ देणारे स्टॉल येथे उभारण्यात येणार आहेत तसेच आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. तरी सदर कार्यक्रमास जास्तीत जास्त लाभार्थी व नागरीक यांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन प्रशासक जगदीश कातकर व मुख्याधिकारी परितोष कंकाळ कणकवली नगरपंचायत यांचेकडून करण्यात आले आहे.
भारत सरकारने “विकसित भारत संकल्प यात्रा” या नावाची देशव्यापी मोहिम 15 नोव्हेंबर ते 26 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये सुरू केली आहे. भारत सरकारच्या प्लॅगशिप योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यापर्यंत वेळेत पोहोचवण्याच्या उद्देशाने “विकसित भारत संकल्प यात्रा” ही मोहिम आखण्यात आली आहे.
या मोहिमेतंर्गत विविध योजनांबद्दल जागरूकता निर्माण करणे, सरकारी योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांशी संवाद साधणे या मोहिमेदरम्यान संभाव्य लाभार्थ्यांची नोंदणी करणे ई.उद्दीष्टे साध्य करावयाची आहेत.
