राम मंदिरामुळे कोट्यावधी भारतीयांच्या मनातील इच्छा पुर्ण…

राजन तेली ; सावंतवाडीत रामभक्तांनी मिरवणूक काढत पुष्पवृष्टी करून दिली जोरदार घोषणाबाजी…

⚡सावंतवाडी ता.२७-: कोट्यवधी भारतीयांचा मनाती इच्छा अखेर पूर्ण होत असून अयोध्या नगरीत राम मंदिरचं उद्घाटन आता २२ तारीखला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. त्यामुळे सर्व जनतेला शुभेच्छा देतो अशी प्रतिक्रिया भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज येथे दिली. दरम्यान देशभरात विविध ठिकाणी आज रामभक्तांनी मिरवणूक काढली. सावंतवाडी शहरात देखील हा पालखी सोहळा पार पडला. पुष्पृष्टी करून राम भक्तांनी जोरदार घोषणाबाजी केली.

यावेळी तेली पुढे म्हणाले की साडेपाच वर्षापासून ज्या प्रतीक्षेची वाट पाहत होतो ती अखेर मोदी सरकारने पूर्ण केली असून देशभरात एक उत्साहाचे वातावरण सध्या पाहायला मिळत आहे. त्यामुळे मी मनापासून सर्व रामभक्त व देशवासीयांचे अभिनंदन करतो असे तेली यावेळी म्हणाले.

You cannot copy content of this page