शिवाजी विद्यापीठाकडून प्रा.जयवंत पाताडे यांना पीएच.डी प्रदान…

⚡कणकवली ता.२२-: कणकवली तालुक्यातील असलदे गावचे सुपुत्र प्रा.जयवंत पाताडे यांना शिवाजी विद्यापीठाकडून पीएच.डी प्रदान करण्यात आली आहे.तु . बा. कदम महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख प्रा. जयवंत पाताडे यांना शिवाजी विद्यापीठाच्या ६० वा दीक्षांत समारंभाचे प्रमुख पाहुणे डॉ. एस. एस. मंथा (माजी अध्यक्ष, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली) व कुलगुरू प्रा. डॉ. दिगंबर शिर्के, कुलसचिव मा. डॉ. विलास शिंदे व परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांच्या उपस्थितीत विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. डॉ. प्रमोद पाटील यांच्या शुभ हस्ते पीएच.डी. (विद्यावाचस्पती) पदवी प्रदान करण्यात आली.

प्रा. जयवंत पाताडे यांनी “बॅरिस्टर नाथ पै : अ फ्रीडम फायटर अँड पर्लमेंटरियन – अ हिस्टॉरिकल स्टडी” या विषयात त्यांनी देवचंद कॉलेज, निपाणीचे इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. सी. एम. नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी आपल्या प्रबंधात नाथ पै यांचा जीवन वृत्तांत, छोडो भारत लढ्यातील योगदान, गोवा मुक्ती लढा, महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्न, राष्ट्र सेवादलातील योगदान, समाजावादातील योगदान, १९५७ ते १९७१ या कालावधीतील त्यांचे संसदीय कार्य व कोकण विकासातील योगदान यासारख्या नाथ पै यांच्या व्यापक जीवन प्रसंगातील कार्याचा वस्तुनिष्ठ व संशोधनात्मक दृष्टीकोनातून आढावा घेतला आहे.

त्यांच्या या संशोधन कार्यासाठी शिवाजी विद्यापीठाचे इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. अवनीश पाटील, प्रा. डॉ. अरुण भोसले, प्रा. डॉ. एम. ए. लोहार प्रा. डॉ. माधव पाटील, प्रा. डॉ. पद्मजा पाटील, प्रा. डॉ. नंदा पारेकर, प्रा. डॉ. राजश्री साळुंखे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. कुणबी शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष श्री. भि. म. गोवळकर, सचिव अॅड. तु. ल. डफळे , सहसचिव द. भि. धुमक खजिनदार राजाभाऊ बैकर, संस्था सदस्य बाबाराम तळेकर, संस्था सदस्य दत्ताशेठ बैकर, प्राचार्य व्ही. एन. साळुंखे, महाविद्यालयाचा प्राध्यापक व कर्मचारी वर्ग यांनी प्रा. जयवंत पाताडे यांचे अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page