महाविद्यालयाने केला सत्कार…
⚡मालवण ता.२१-: गेल्या काही वर्षात चीन भारत गलवान बॉण्ड्रीवर युद्ध होण्याची भीती सातत्याने निर्माण झालेली होती.. भारताचे व चीनचे सैनिक आमने सामने आलेले होते . युद्ध कधी होईल याची गॅरंटी नव्हती .ज्या ठिकाणी मायनस डिग्री टेंपरेचर असते अशा ठिकाणी शुभम साळुंखे हा आमचा कॉलेजचा विद्यार्थी जाऊन देशाच्या रक्षणासाठी हातात रायफल घेऊन उभा राहतो ही एक आम्हाला व आमच्या कॉलेजला अभिमानाची गोष्ट आहे असे प्रतिपादन मालवण येथील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे प्राचार्य शिवराम ठाकूर यांनी येथे बोलताना केले
मालवण येथील स.का. पाटील सिंधुदुर्ग कॉलेजचा राष्ट्रीय छात्र सेना (NCC)विभागाचा एनसीसी कॅडेट शुभम साळुंखे हा नुकताच भारतीय सैन्य दलात भरती झाला आहे. सध्या त्याची ट्रेनिंग पूर्ण होऊन तो भारत चीन सीमेवर गलवान या ठिकाणी देशाच्या रक्षणासाठी दाखल झालेला आहे. तो आज मालवण येथे आल्यानंतर कॉलेजच्यावतीने त्याचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी एनसीसी विभाग प्रमुख लेफ्टनंट प्रा.डॉ एम आर खोत.,58 महाराष्ट्र बटालियन चे सुभेदार महेंद्र व पटेल, कैलास साळुंखे डॉ. सुमेधा नाईक डॉ उज्वला सामंत, ओ .एस.कैलास साळुंखे डॉ.हंबीरराव चौगुले श्रीमती सुचिता बेलेकर , तृप्ती चव्हाण, प्रा. अनुराधा गावडे प्रा . रेशमी राऊळ .प्रा संग्राम पवार आदी मान्यवर उपस्थित होते
शुभम याने कॉलेजमधील विद्यार्थ्यांना आर्मी का जॉईन करावी याबद्दल सर्व माहिती सांगितली .तसेच त्याचे मार्गदर्शक NCC विभाग प्रमुख लेफ्टनंट एम आर खोत सर प्राचार्य शिवराम ठाकूर सर आणि कॉलेज यांचे आभार व्यक्त केले.
यावेळी एनसीसी चे सर्व बॉईज कॅडेट्स अँड गर्ल्स कॅडेट्स उपस्थित होते.
