आडवण देऊळवाडा येथील मायनर ब्रिज कामाचे भूमिपूजन…

⚡मालवण ता.२१-: गेली कित्येक वर्षे नागरिकांची मागणी असलेला मालवण शहरातील आडवण देऊळवाडा येथील नवीन आरसीसी मायनर ब्रिज कामाचे भूमिपूजन भाजप नेते, माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्थानिक ज्येष्ठ नागरिक लक्ष्मण करलकर यांच्या हस्ते करण्यात आले.

या ब्रिज कामासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून माजी खासदार निलेश राणे यांनी ४५ लाख पेक्षा जास्त निधी मंजूर करून दिला आहे, अशी माहिती स्थानिक माजी नगरसेविका तथा भाजप महिला तालुकाध्यक्ष पूजा करलकर यांनी दिली.

यावेळी भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी नगरसेविका पूजा करलकर, माजी नगरसेवक आप्पा लुडबे, दीपक पाटकर, जगदीश गांवकर, पंकज सादये, संदीप परब, प्रमोद करलकर, राजू बिडये, विक्रांत नाईक, अवी सामंत, भालचंद्र राऊत, युवा मोर्चा शहरअध्यक्ष ललित चव्हाण, भाजप ओबीसी मोर्चा महिला तालुकाध्यक्ष पूजा वेरलकर, माजी नगरसेविका महानंदा खानोलकर, महिमा मयेकर, शुभांगी ठुबरे, विशाखा पाटकर, दीपाली गोवेकर, साधना आकेरकर, सौरभ ताम्हणकर, राकेश सावंत, निशय पालयेकर यासह स्थानिक नागरिक संदीप लुडबे, बाळा आचरेकर, दत्ता पाटकर, जयवंत चव्हाण, रामचंद्र करलकर, अक्षय माणगावकर, दिलीप नाईक, सुबोध केळूसकर, संजय वराडकर, दीपक जुवेकर, महिमा मयेकर, संजय आकेरकर, प्रमोद डिचोलकर, आकेरकर, आंब्रडकर यासह अन्य उपस्थित होते.

You cannot copy content of this page