मनसेची बांदा आरोग्य केंद्रात धडक…

रोणापाल येथील उपकेंद्रात आरोग्य सुविधांची वानवा: महिनाभरात सर्व समस्या मार्गी लावण्याचे दिले आश्वासन..

⚡बांदा ता.२१-: बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या रोणापाल येथील उपकेंद्रात आरोग्य सुविधांची वानवा असून हे आरोग्य केंद्र समस्याच्या गर्तेत सापडले आहे. या आरोग्य केंद्राच्या आवारात झाडी वाढल्याने अस्वछता पसरली असून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ऍड. अनिल केसरकर यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी बांदा आरोग्य केंद्रात धडक देत वैद्यकीय अधिकाऱ्यांना जाब विचारला.

आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या सात उवकेंद्रात अशीच परिस्थिती असून येत्या महिन्याभारत सर्व समस्या मार्गी लावण्याच्या सूचना मनसे पदाधिकाऱ्यांनी दिल्या. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन सारंग, डॉ. मयुरेश पटवर्धन आदी उपस्थित होते.
रोणापाल रुग्णालयाच्या आवारात अस्वच्छता असून याठिकाणी पिण्याच्या पाण्याची देखील सोय नाही. याठिकाणी मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. केसरकर, सावंतवाडी विधानसभा संपर्क अध्यक्ष महेश परब, उपजिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ, विधानसभा सचिव गुरुदास गवंडे, सावंतवाडी तालुका अध्यक्ष मिलिंद सावंत, माजी उपतालुकाध्यक्ष सुनील आसवेकर, विष्णू वसकर यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली.
रुग्णालय असूनही रुग्णांना उपचारासाठी मडुरा किंवा बांदा येथे जावे लागते. याबाबत मनसे पदाधिकाऱ्यांनी जाब विचारला. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा शिरोडकर यांच्याशी देखील चर्चा करण्यात आली. येत्या महिन्याभारत सर्व समस्यांचे निराकरण करण्याची मागणी करण्यात आली. वैद्यकीय अधिकारी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन सर्व समस्या मार्गी लावाव्यात. तसेच रुग्णांना वेळेत उपचार कसे मिळतील याकडे लक्ष देण्याबाबत सूचना देण्यात आल्या. यासंदर्भात लवकरच सावंतवाडी येथे तालुका वैद्यकीय अधिकारी यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे तालुकाध्यक्ष सावंत यांनी सांगितले.

You cannot copy content of this page