सावंतवाडीत होणार सुंदरवाडी मिनी महोत्सव….

२७ ते ३१ रोजी आयोजन; शहरवासीयांना मनोरंजनाची मेजवाणी

⚡सावंतवाडी ता.२१-* येथील दिपक केसरकर मित्र मंडळ प्रायोजित इनरव्हील रोटरी क्लब व सामाजिक बांधिलकी यांच्या माध्यमातून 27 ते 31 दरम्यान मिनी महोत्सवाचे  2023 आयोजन करण्यात आले आहे.याबाबतची माहिती दिपक केसरकर मित्र मंडळ व सामाजिक बांधिलकी यांनी संयुक्त परिषदेत दिली.दरम्यान यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.ते सावंतवाडीत संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, शहर प्रमुख बाबू कुडतरकर, रिया रेडीज,रवि जाधव,संजय अक्षता सावंत आदी उपस्थित होते.

श्री.पोकळे म्हणाले, सावंतवाडी शहरातील नागरिकांसाठी मनोरंजनात्मक दृष्ट्या या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे व महोत्सवात गार्डन परिसरामध्ये खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात येणार आहे तर चारही दिवस भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये 27 डिसेंबरला रेकॉर्ड स्पर्धा यामध्ये लहान गट व मोठा गट 28 डिसेंबरला ओंकार कला मंच सांस्कृतिक कार्यक्रम तर 29 डिसेंबरला लावण्यखणी हा नृत्याचा कार्यक्रम होणार आहे ठाकरे या कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक बांधिलकीच्या वतीने करण्यात आले आहे.


30 डिसेंबर रोजी इनरव्हील क्लब च्या वतीने ‘इनरव्हील क्वीन’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तर 31 डिसेंबर रोजी रोटरी क्लबच्या माध्यमातून हेमांगी सावंत यांचा ऑर्केस्ट्रा कार्यक्रम होणार आहे तरी शहरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले

You cannot copy content of this page