उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव यांचा माऊली मित्रमंडळाने केला सत्कार…

⚡कणकवली ता.२१-: कणकवलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव यांचा माऊली मित्रमंडळ, जुने भाजीमार्केट व्यापारी मित्रमंडळ, राजेंद्र मनोहर पेडणेकर मित्र, शालेय मित्रमंडळ, ॐ नमो भगवते भालचंद्राय आणि समस्त कणकवलीवासी यांच्यावतीने सन्मान करण्यात आला.

यावेळी राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी आपले पोलीस दलाबद्लचे आपले विचार व्यक्त केले आणि सत्कार स्विकारल्याबद्दल आभार व्यक्त केले.यावेळी प्रभाकर कदम, महेश वायंगणकर, सईद नाईक, प्रसाद घाडीगांवकर, अविनाश गावडे, प्रसाद पाताडे आदी उपस्थित होते.

उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव यांचा सामाजिक कार्यकर्त्या सौ. सुप्रिया पाटील यांच्या हस्ते संजय मालंडकर, भगवान कासले यांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना सौ. पाटील म्हणाल्या ,आज सामान्य नागरिक आपल्या दैनंदिन धावपळीच्या जीवनात रात्रीची शांत झोप घेऊ शकतो, ती फक्त आणि फक्त आमच्या पोलीस बांधवांमुळेच.

You cannot copy content of this page