⚡सावंतवाडी ता.२०-: मळेवाड म्हापसेकरवाडी रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ भाजप बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी यांच्या हस्ते करण्यात आला.
ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेच्या कार्यक्षेत्रातील मळेवाड म्हापसेकरवाडी मध्ये जाणारा रस्ताखड्डेमय झाल्याने वाहनधारक व पादचारी याना त्रास होत होता.यामुळे रस्त्याचे डांबरीकरण व मजबुतीकरण होणे गरजेचे होते.यासाठी भाजप बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी,भाजप मळेवाड शक्ती केंद्रप्रमुख लाडोबा केरकर व उपसरपंच हेमंत मराठे यांच्या प्रयत्नातून या रस्त्यासाठी विकास निधी उपलब्ध करून देण्यात आला.या रस्त्याच्या डांबरीकरणाचा शुभारंभ भाजपचे बांदा मंडळ अध्यक्ष महोश धुरी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.यावेळी गावाच्या विकासासाठी भाजपच्या माध्यमातून आणखीन निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन धुरी यांनी दिले .यावेळी सरपंच मिलन पार्सेकर,उपसरपंच हेमंत मराठे,ग्रामपंचायत सदस्य मधुकर जाधव,ग्रामपंचायत सदस्य महेश शिरसाट,भाजप जिल्हा सरचिटणीस नारायण कांबळी,भाजप मळेवाड शक्ती केंद्रप्रमुख लाडोबा केरकर,भाजप बूथ अध्यक्ष भिवसेन मुळीक,माजी ग्रामपंचायत सदस्य भगवान मुळीक,मळेवाड विकास सोसायटी संचालक बाबल नाईक,पोलीस पाटील दिगंबर मसुरकर ,परशुराम मुळीक,वैभव मोरुडकर,प्रथमेश मुळीक,बबन मुळीक,जोगेंद्र मुळीक,बाळू मुळीक,नारायण नाईक,कृष्णा मुळीक, दीपक मेस्त्री,नाना मेस्त्री,उदय मेस्त्री,सुरेश मसुरकर,विनायक मुळीक,तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मळेवाड म्हापसेकरवाडी रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा महेश धुरी यांच्या हस्ते शुभारंभ…
