म्हापण खालचावाडा दत्तमंदिर येथे दत्तजयंती निमित्ताने २२ डिसेंबर पासून भरगच्च कार्यक्रम…

⚡कुडाळ ता.२०-: म्हापण खालचावाडा दत्तमंदिर येथे दत्तजयंती निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन २२ ते २८ डिसेंबर रोजी करण्यात आले आहे.
उत्सव कालावधीत दररोज सकाळी श्रींचे पूजन, भिक्षा फेरी, प्रसाद. सायं. धुपारती, पुराण वाचन व कीर्तन हे नित्य कार्यक्रम होणार आहेत. दररोज रात्री ९ वाजता किर्तन होणार आहे. शुक्रवार २२ डिसेंबर २०२३ – ह.भ.प. चिंतामणी सामंत, शेळपी यांचे किर्तन,शनिवार २३ डिसेंबर २०२३ – ह.भ.प. कु. अनन्या ठाकूर, म्हापण यांचे किर्तन,रविवार २४ डिसेंबर २०२३- ह.भ.प.श्री. सदाशिव पाटील, आंदुर्ले यांचे किर्तन,सोमवार २५ डिसेंबर २०२३ रोजी ह.भ.प. स्नेहलदीप सामंत, हुमरमळा यांचे किर्तन होणार आहे.२६ डिसेंबर २०२३ मंगळवार (श्री दत्त जयंती ) सकाळी ९ वाजता-लघुरूद्र, सायंकाळी ४ वाजता -पुराण, सायंकाळी ५ वाजता जन्मोत्सव कीर्तन (ह.भ.प. श्री. विश्वनाथ नाईक, वेतोरे) सायंकाळी ६.३० वाजता श्री दत्त जन्मोत्सव आणि पाळणा, रात्री ८ वाजता पालखी प्रदक्षिणा बुधवार दि.२७ डिसेंबर रोजी दुपारी ३.३० ते ६ वा.- ह. भ. प. श्री पोळजी महाराज, आसोली यांचे प्रवचन, रात्री ८ वाजता पालखी प्रदक्षिणा ,रात्री १० वाजता -कीर्तन (ह.भ.प. अमल ठाकूर, मुंबई) , गुरूवार दि २८ डिसेंबर रोजी सकाळी-अभिषेक, श्रींचे पूजन, दुपारी १२ ते १ वा .- भक्तिसंगीत, आरती, दु .१ वा.वाजता महाप्रसाद, रात्रौ ७ ते ८ वा रामकृष्ण हरी भजन मंडळ, कर्ली यांचे भजन, ८ ते ९ वा. धुपारती, रात्री ९ ते १०.३० वा तुळशीमाता पांडुरंग भजन मंडळ, ताळगाव-गोवा यांचे भजन , १०.३० ते १२ घूमडाई प्रासादिक, घुमडे-मालवण यांचे भजन, १२ ते १ वा.वारकरी भजन, खोत आणि मंडळी म्हापण यांचे रात्री १.३० ते २ वा – पुराणवाचन, २ ते ४ वा पालखी प्रदक्षिणा, ४ ते ५ वा .कीर्तन (ह. भ. प. श्री. जगन्नाथ सामंत, शेळपी), ५ ते ६.३० लळीत (प्रभूकोचरेकर मंडळी, कोचरा) तरी या सर्व कार्यक्रमांचा लाभ भाविक भक्तांनी मोठया संख्येने घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page