सेवानिवृत्त झालो तरी ज्ञानदानाचे कार्य सुरुच ठेवणार…

विद्याधर देसाई:आरोस येथे विद्याधर देसाईं यांचा सेवानिवृत्त सोहळा संपन्न..

⚡सावंतवाडी ता.२०सहदेव राऊळ -: सेवानिवृत्त झालो तरी ज्ञानदानाचे कार्य यापुढेही सुरुच ठेवणार, असे प्रतिपादन आरोस पंचक्रोशी विद्याविकास हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक विद्याधर देसाई यांनी केले.
आरोस पंचक्रोशी विद्याविकास हायस्कूलचे मुख्याध्यापक विद्याधर नानासाहेब देसाई हे ३० वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून स्वेच्छा निवृत्तीनुसार सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या या कार्याची दखल घेत शाळा व संस्थेच्यावतीने त्यांचा शुभेछा प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी आपल्या सत्कार सोहळ्यात देसाई बोलत होते.यावेळी संस्था अध्यक्ष रोहिदास सावंत ,माजी संस्था अध्यक्ष श्रीधर नाईक, उपाध्यक्ष निलेश परब, सेक्रेटरी राजन नाईक, संस्था सदस्य श्रीकृष्ण पुनाळेकर, अर्जुन मुळीक, मिलिंद जोग, सत्कार मुर्ती विद्याधर देसाई, पत्नी विविधा देसाई, श्रीपतराव देसाई, परेश देसाई, प्रिया देसाई
तांबोळी माजी सरपंच अभिलाश देसाई, माजी मुख्याध्यापक-श्री. रमेश डामरेकर, आसोलकर सर, सुरेश गावडे, संदिप नेमळेकर, शिक्षक पालक संघ सदस्य झारापकर, माजी शिक्षक पालक संघ उपाध्यक्ष भानुदास मुळीक,
माजी शिक्षकेतर कर्मचारी लक्ष्मण शेळके, रमाकांत आरोसकर, सुमंत मुळीक नाबर
विदयालयाचे लिपिक तानाजी खोत, सहकारी शिक्षक अनिल नाईक, एल. के. सावंत, तानाजी वरक, श्रद्धा मुळीक, मिताली नाईक, माजी विद्यार्थी, विद्यार्थीनी
प्रशालेतील सर्व विदयार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होते. गेली तीस वर्ष अविरतपणे सेवा बजावत असताना देसाई यांनी शाळेच्या प्रगतीसाठी भरपूर मेहनत घेतली. देसाई निवृत्ती झाल्याने शाळा व संस्था यांच्यावतीने त्यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. यावेळी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी देसाई यांच्या आठवणी जाग्या केल्या तर काहींनी कवितारुपी शब्दसुमनांनी स्तुती केली. व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, सरांचा मित्रपरिवार, सहकारी शिक्षकवर्ग, विद्यार्थी यांनी देसाई यांना शुभेच्छा देत शाळेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल प्रशंसा केली. यावेळी देसाई यांनी शाळा, संस्था, विद्यार्थ्यानी दिलेल्या सन्मानाचा मान राखत आभार मानले.

You cannot copy content of this page