सावंतवाडी तालुक्यात ठाकरे युवा सेनेला मोठा धक्का…?

गुणाजी गावडे देणार युवा सेना तालुकाप्रमुख पदाचा राजीनामा: पुढील राजकीय भूमिका काय घेणार..? याकडे सर्वांचे लक्ष…

⚡सावंतवाडी ता.२०- : वेत्ये येथील ठाकरे युवा सेनेचे तालुकाप्रमुख गुणाजी गावडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचं ठरवलं आहे, याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रकद्वारे माहिती दिली. दरम्यान त्यांच्या या राजीनाम्यामुळे तालुक्यात ठाकरे युवा सेनेला मोठा धक्का मानला जात असून त्यांच्या या निर्णयामुळे वरिष्ठ आता काय निर्णय घेता याकडे देखील सर्वांचं लक्ष आहे.

दरम्यान गुणाजी गावडे नेमकी आता पुढील राजकीय भूमिका काय घेणार याकडे देखील वेत्ये गावासह पूर्ण तालुकावासीयांच यांचे लक्ष लागले. दरम्यान त्यांनी हा राजीनामाला कशाला दिला हे मात्र समजू शकलं नसलं तरी ठाकरे सेनेला मात्र हा मोठा धक्का मानला जात आहे

You cannot copy content of this page