व्हाईस चेअरमन पदी संजय गवस:तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांच्या कडून पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन…
⚡सावंतवाडी ता.२०-:
सावंतवाडी तालुका विविध औद्योगिक सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी संदिप माळकर तर व्हाईस चेअरमन पदी संजय गवस यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. संस्थेच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात भरीव योगदान देण्याचा प्रयत्न राहील असे नुतन चेअरमन श्री माळकर म्हणाले.
सावंतवाडी कंझ्युमर्स सोसायटीचे माजी अध्यक्ष गजानन सावंत यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या संस्थेच्या निवडणुकीत या संस्थेवर
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रणित उत्कर्ष पॅनेलने सर्व अकरा जागा जिंकत दणदणीत विजय मिळविला होता. आज याबाबत चेअरमन व्हाईस चेअरमन निवडणुक पार पडली. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी दोघांचेही पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी संचालक सदानंद चव्हाण,पुरुषोत्तम राऊळ, नारायण सावंत,संजय गावडे त्यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी चंद्रकांत कासार मायकल डिसोजा शिवदत्त घोगळे सुनील गावडे शब्बीर मणियार श्रुतिका दळवी भारती कासार नम्रता झारापकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
