प्रा. कैलास राबते यांना राज्यस्तरीय लोकराजा शाहू आदर्श समाजसेवा पुरस्कार…

⚡मालवण ता.१८-: लोकराजा शाहू छत्रपती चॅरीटेबल ट्रस्ट इचलकरंजी या संस्थेच्या वतीने क्रिडा, शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय व साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय काम‌गिरी करणा-याना दिला जाणारा यंदाचा राज्यस्तरीय लोकराजा शाहू आदर्श समाजसेवा गौरव पुरस्कार २०२३ मालवणच्या स का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे प्रा कैलास राबते यांना जाहीर करण्यात आला आहे

लोकराजा शाहू छत्रपती चॅरीटेबल ट्रस्ट इचलकरंजी ही संस्था गेली १० वर्षे सामाजिक, शैक्षणिक, क्रिडा, साहित्य क्षेत्रात कार्यरत आहे समाजात वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तीचा यथोचित गौरव करण्यात येतो. प्रा. कैलास राबते हे मालवणच्या स.का. पाटील सिंधूदुर्ग महाविद्यालयामध्ये मराठी विषयाचे प्राध्यापक व विभाग प्रमुख म्हणून गेली २३ वर्ष कार्यरत आहेत. एक विद्यार्थी प्रिय प्राध्यापक गरीबीची जाणीव ठेवून काम करणारे मनमिळावून, अभ्यासू प्राध्यापक म्हणून त्यांची ओळख आहे. अध्ययन-अध्यापन कामाबरोबरच आपण समाजाचे व शिक्षण संस्थेचे काहीतरी देणे लागतो, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून ते आपल्या परीने सामजिक, शैक्षणिक व साहित्य क्षेत्रात आपले योगदान देत असतात. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. हा पुरस्कार दि. २१ डिसेंबर २०२३ रोजी इंचलकरंजी ता. हातकणंगले जि. कोल्हापूर ना. बा. घोरपडे नाट्यगृह, इचलकरंजी येथे मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे संकल्पक प्रमुख अरुण कांबळे यांनी
दिली आहे

प्रा राबते यांना राज्यस्तरीय शाहू पुरस्काराने सन्मानीत करण्यात येत असल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

You cannot copy content of this page