मालवणमधील स्वच्छता दूत व पोलिसपाटील कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानीत

खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे आयोजन

मालवण : खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण शहर शिवसेनेच्या वतीने शहरातील स्वच्छता दूत व पोलीस पाटील यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. मालवण नगरपरिषद कायमस्वरूपी स्वच्छता कर्मचारी, ग्रामीण रुग्णालय कर्मचारी तसेच शहरातील पोलीस पाटील वासुदेव गावकर व पांडुरंग चव्हाण यांना सन्मानित करण्यात आले. नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या संकल्पनेनुसार हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी बांधकाम सभापती मंदार केणी, शहर प्रमुख बाबी जोगी, नगरसेवक नितीन वाळके, सेजल परब, सुनीता जाधव, पूनम चव्हाण, अंजना सामंत, दीपा शिंदे, नीलम शिंदे, विद्या फर्नांडिस, पूजा तोंडवळकर, नीना मुंबरकर, तपस्वी मयेकर, उमेश मांजरेकर व अन्य उपस्थित होते.

You cannot copy content of this page