सावंतवाडी शिंदेसेनेचा बीएसएनएला इशारा; मंत्री केसरकर यांनीही वेधले जिल्हा प्रबंधाचे लक्ष..
⚡सावंतवाडी ता.१८-: येथील दूरसंचार कार्यालयात बसवलेला आवाज विरहीत जनरेटर रत्नागिरीला हलवण्यास आमचा विरोध आहे. हा जनरेटर आम्ही केलेल्या सततच्या मागणीमुळे सावंतवाडीला मिळाला आहे त्यामुळे हा जनरेटर सावंतवाडीतच असला पाहिजे अशी मागणी शिंदे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज बीएसएनएल जिल्हा प्रबंधक आर व्ही जन्नू यांच्याकडे केली.
दरम्यान मंत्री दीपक केसरकर यांनीही दूरध्वनी वरून श्री जन्नू यांच्याशी संपर्क साधून हा जनरेटर रत्नागिरीला हलवू नका असे त्यांनी सांगितले.
याबाबत जन्नू बोलतान म्हणाले की; सावंतवाडी साठी 60kb जनरेटरची आवश्यकता आहे आता असलेल्या जनरेटर 160kb असल्याने तो बदलला जात आहे. नव्याने येणारा जनरेटर हा आवाज विरहितच असणार त्यामुळे याचा त्रास कोणत्याही प्रकारे जनतेला होणार नाही असेही श्री जन्न म्हणाले.
यावेळी शहरप्रमुख बाबू कुडतरकर,महिला शहरप्रमुख भारती मोरे,निलीमा चलावडी, विशाल बांदेकर , माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर परशुराम चलावडी,माजी नगरसेवीका संपन्ना नाटेकर, लतिका सावंत,आदी उपस्थित होते.
