⚡वेंगुर्ला ता.१७-: बॅ. खर्डेकर महाविद्यालयातील कनिष्ठ विभागाच्या क्रीडा महोत्सवात बी.के.सी.इंडियनस व बी.के.सी.चॅलेंजरस या दोन संघात मुलांचा अंतिम क्रिकेट सामना खेळविण्यात आला. यात बी.के.सी.चॅलेंजरने विजेतेपद तर बी.के.सी.इंडियनस संघाने उपविजेतेपद पटकाविले. तर मुलींमध्ये बी.के.सी.ऍव्हीएटर व बी.के.सी.शुटिग स्टार यामध्ये अंतिम सामना रंगून यात बी.के.सी.शुटींग स्टार विजेतेपद संपादन केले. मुलांमध्ये मालिकावीर मंदार खोत, फलंदाज सुयश मोंडकर, उत्कृष्ठ गोलंदाज पार्थ सावंत तर मुलींमध्ये उत्कृष्ठ फलंदाज निकिता फर्नांडीस आणि उत्कृष्ठ गोलंदाज किर्ती पालव हे मानकरी ठरले. पंच म्हणून प्रा.अनिकेत कदम, प्रा.मडिवाळ व प्रा.मेतरे यांनी काम पाहिले.
स्पर्धेचे बक्षिस वितरण उमेश येरम, प्राचार्य डॉ.एम.बी.चौगले, डॉ.डी.एस.पाटील, डी.जे.शितोळे, सुरेंद्र चव्हाण, डी.एस.पाटील यच्या हस्ते झाले. महोत्सव यशस्वी होण्यासाठी प्रा.व्ही.पी.देसाई व प्रा.हेमंत गावडे यांनी परिश्रम घेतले.
फोटोओळी – स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
