⚡वेंगुर्ला ता.१७-: नगर वाचनालय, वेंगुर्लातर्फे अनिल श्रीकृष्ण सौदागर पुरस्कृत कै.पद्माकर सखाराम सौदागर स्मृती तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेत लहान गटात गिरीजा परब तर मोठ्या गटात सिद्धी गावडे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
लहान गटामध्ये तालुक्यातील १५ शाळांमधून ९६ मुले सहभागी झाली होती. यात प्रथम-गिरीजा परब (वेंगुर्ला हायस्कूल), द्वितीय-सर्वेश मेस्त्री (वेंगुर्ला नं.३), तृतीय-मनोहर खाडे (खानोली नं.१), चतुर्थ-काव्या राऊळ (सिधुदुर्ग विद्यानिकेतन), पाचवा-भुमिका असनकर (वेंगुर्ला नं.४) तर मोठ्या गटात ११ शाळांमधून ५० मुले सहभागी झाली होती. यात प्रथम-सिद्धी गावडे (सिधुदुर्ग विद्यानिकेतन), द्वितीय-दिक्षा पालकर (अणसूर पाल हायस्कूल), तृतीय-स्नेहल चुडजी (सिधुदुर्ग विद्यानिकेतन), चतुर्थ-सादिका गोलंदाज (पाटकर हायस्कूल), पाचवा-पार्थ परब (एम.आर.देसाई इंग्लिश स्कूल) यांनी क्रमांक पटकाविले. स्पर्धेचे परिक्षण समिर पेडणेकर व यामेश खवणेकर यांनी केले. विजेत्यांना २१ जानेवारी रोजी गौरविण्यात येणार आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संस्था कार्याध्यक्ष अनिल सौदागर, उपाध्यक्ष अॅड.देवदत्त परूळेकर, कार्यवाह कैवल्य पवार, उपकार्यवाह माया परब, सदस्य महेश बोवलेकर, राजेश शिरसाट, मंगल परूळेकर, भाऊ करंगुटकर, निवास सौदागर यांनी सहकार्य केले.
