जनता 2024 ला देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच साथ देतील…

अजयकुमार मिश्रा ;ईडीच्या चौकशा सुरू राहणार…

⚡सावंतवाडी ता.१५-: गेल्या नऊ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात अनेक योजना व विविध प्रकल्प राबविले आहेत, मात्र विरोधक हताश होऊन नाहक आरोप करत आहेत. परंतु लोकांचा विश्वास हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच आहे. त्यामुळे २०२४ ला देखील जनता मोदींना साथ देतील, असा विश्वास केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी आज येथे व्यक्त केला.
दरम्यान भाजपमध्ये आले की ईडीच्या चौकशी बंद होतात हे विरोधकांच्या गैरसमज असून ज्यांच्या चौकशी सुरू आहेत त्या चौकशी सुरूच राहणार असे श्री मिश्रा यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले असताना ते सावंतवाडी पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी श्री. मिश्रा पुढे बोलताना म्हणाले की विकसित भारत संकल्प यात्रा ही 15 नोव्हेंबर ते 26 जानेवारी पर्यंत देशभरात विविध राज्यात तळागाळापर्यंत पोहोचणार आहे लोकांच्या ज्या काही समस्या तसेच मोदींच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचल्या का या दृष्टीने ही यात्रा काढण्यात येत असल्याचे देखील श्री मिश्रा यांनी यावेळी सांगितले.दरम्यान नरेंद्र मोदी हे जेव्हा पंतप्रधान देशाचे झाले तेव्हापासून भारत देश हे प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असून त्यांनी अनेक देशांबरोबर चांगले संबंध जुळले आहेत त्यामुळे विरोधक हे कुठेतरी त्यांना पोटसूल होत असल्याने धाक त्यांना आता हे बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र जनता याला बळी पडणार नसून येणाऱ्या निवडणुकीत देखील ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच साथ देतील असं विश्वास देखील श्री मिश्रा यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी माजी आमदार प्रमोद जठार, माजी आमदार राजन तेली, शहराध्यक्ष अजय गोंदावळे, दिलीप भालेकर, परीक्षेत मांजरेकर, सचिन साटलकर आधी उपस्थित होते

You cannot copy content of this page