तळवडे ग्रामपंचायतीचा त 23 लाख रुपयाचा निधी ऑनलाईन पध्दतीने परस्पर हडप…

ज्यांचा सहभाग आहे त्यांची चौकशी करुन फौजदारी गुन्हे दाखल करा:भाजपचे सदस्य दादा परब यांची मागणी…

⚡सावंतवाडी ता.१४-: तळवडे ग्रामपंचायतीच्या पंधरा वित्त आयोगाच्या आराखड्यातील काम प्रत्यक्षात जागावर झाले नसतांना तळवडे ग्रामपंचायतीचा तब्बल एकूण 23 लाख रुपयाचा निधी ऑनलाईन पध्दतीने परस्पर हडप करण्यात आला असून यामध्ये ज्यांचा सहभाग आहे त्यांची चौकशी करुन फौजदारी गुन्हे दाखल करा अशी मागणी तळवडे ग्रामपंचायचे भाजपाचे सदस्य दादा परब यांनी केली.
श्री परब यांनी आज या संदर्भात सावंतवाडी भाजपा विधानसभा कार्यालयात पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले तळवडे ग्रामपंचायतच्या 15 वित्त आयोगामध्ये समाविष्ट असलेली, काळोबा मंदिर घाट पायऱ्या बांधणे, ग्रामपंचायत हद्दीतील नवीन घाटपाऱ्या बांधणे, ग्रामपंचायत हद्दीतील प्राथमिक शाळा मधील शौचालय मुतारी दुरुस्ती रंग रोटी करणे, मागासवर्गीय वस्तीतील सार्वजनिक विहीरीवर लोखंडी रिंग बसवणे, ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात शाळांसाठी साहित्य पुरवणे, ग्रामपंचायत संगणक प्रिंटर खरेदी करणे, पाणीपुरवठा पाण्याचे टाकी दुरुस्त करणे या कामांना कोणत्याही प्रकारची तांत्रिक शासकीय मान्यता नसताना तसेच अंदाजपत्रकीय मान्यता नसताना निविदा प्रक्रिया राबवली नसताना तसेच प्रत्यक्षात जागेवर कामच झाले नसताना परस्पर 23 लाख रुपयांचा निधी ठेकेदारांच्या खात्यावर वळवण्यात आला आहे. ही रक्कम एकूण तीन ठेकेदारांच्या खात्यावर वळवण्यात आली आहे हा प्रकार ऑनलाईन पद्धतीने झाला. प्रकार म्हणजे शासनाची फसवणूक असून ज्यांनी कोणी प्रकार केला आहे त्यांची चौकशी करून संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा.
ते पुढे म्हणाले यासंदर्भात आपण पुरावे मिळवले असून तशा प्रकारची लेखी तक्रारही पालकमंत्री जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे. हडप करण्यात आलेला निधी हा गावाच्या विकासाचा होता तो चुकीच्या पद्धतीने हडप करणे योग्य नाही त्यामुळे संबंधितांवर कारवाई व्हावी ही मागणी आम्ही लावून धरणार आहोत. यावेळी ग्रामपंचायत सदस्य स्मिता परत सुरेश मांजरेकर मंगलदास पेडणेकर नम्रता गावडे यांच्यासह ग्रामस्थ सतीश जाधव, उदय शिरोडकर, वासुदेव जाधव, सुधाकर जाधव, बंटी जाधव, शंकर सावंत, आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page