बबन साळगावकर यांचा आरोप; संबंधित इंजिनिअर तात्काळ गुन्हे दाखल करा, पोलीस निरीक्षकांकडे मागणी
⚡सावंतवाडी ता.१४: आंबोली-सावंतवाडी रस्त्याचं काम सुरू असताना इंजीनियरिंगच दुर्लक्ष झाल्यानेच या रस्त्यावर खड्डे पडून अपघात झालेत आहेत. दरवर्षी हा रस्ता खराब होतो. या खड्डयांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करावी व लोकांच्या अपघात, मृत्यूस कारणीभूत ठरल्यानं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केली.
माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्यासह माजी नगरसेवकांनी आज पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांची भेट घेत याबाबतच निवेदन दिलं. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे हे रस्ते निष्कृष्ट दर्जाचे होत आहेत. भ्रष्टाचारासाठी अधिकारी व ठेकेदार यांच्यात संगनमत आहे. या अधिकाऱ्यांची त्यांच्या मालमत्तेची चौकशी करावी, तसेच गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्यासह माजी नगरसेवकांनी केली. श्री साळगावकर यांनी आज सावंतवाडी पोलीस ठाण्यावर माजी नगरसेवकांसोबत धडक देत संबंधित इंजिनिअरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
याबाबत अधिक माहिती आशी की आंबोली घाटात ज्यावेळी रस्त्याचं काम सुरू होत त्यावेळी इंजिनिअर यांनी लक्ष देण्याची गरज होती. परंतु त्या इंजिनिअर यांनी दुर्लक्ष केल्यामुळे हे काम निष्कृष्ट दर्जाचे झाले आहे. तसेच या घाटात मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी असते त्यामुळे इंजिनिअरने रस्त्याचं काम सुरू असताना लक्ष देण्याची गरज होती. परंतु तसं न झाल्याने आज नाहक त्रास वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. दरवर्षी हा रस्ता खराब होतो. ज्या मार्गाने शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, पालकमंत्री रविंद्र चव्हाण प्रवास करतात त्याच रस्त्यावर भ्रष्टाचार करण्याची हिंमत हे अधिकारी करत आहेत.
त्यामुळे तात्काळ संबंधित इंजिनिअरिंगवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली. गुन्हे दाखल न झाल्यास तर आपण न्यायालयात जाऊ असा इशारा देखील श्री साळगावकर यांनी यावेळी दिला आहे. दरम्यान याबाबत आपण बांधकाम विभागाला लेखी स्वरुपात पत्र देऊन जबाब घेऊ, गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया करू असे आश्वासन पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी माजी नगराध्यक्षांना दिले. यावेळी साळगावकर यांनी येथील शहरात आठवड्या भरपूर घडलेल्या खुना प्रकरणात जलद गतीने तपास करून आरोपीला गजाआड केल्याबद्दल श्री. अधिकारी यांचा सत्कार केला.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष उमाकांत वारंग, माजी नगरसेवक सुरेश भोगटे,माजी नगरसेवक विलास जाधव, माजी नगरसेवक उमेश कोरगावकर, सिताराम गावडे, बंटी माठेकर ,रवी जाधव, सुधीर पराडकर, अभय पंडित, प्रदीप ढोरे, आसिफ बिजली, मनोज घाटकर, तौकीर शेख आदी उपस्थित होते.
