दीपक केसरकर:नागपूर येथे आरोग्यमंत्री व मंत्री केसरकर यांची बैठक संपन्न..
⚡सावंतवाडी ता.१२- : वेंगुर्ला, दोडामार्ग शिरोडा व सावंतवाडी रुग्णालयात नवीन डॉक्टरांची भरती सुरु झाली आहे. चारही रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक लवकरच देण्यात येणार आहे, तसा निर्णय झाला आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
नागपूर येथे आरोगयमंत्री तानाजी सावंत व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची बैठक पार पडली.वेंगुर्ला, दोडामार्ग शिरोडा मतदार संघातील रुग्णालयाच्या आरोग्य व्यवस्थेविषयी या बैठकीत चर्चा झाली.या बैठकीनंतर केसरकर बोलत होते.
ते पुढे म्हणाले, आपल्याकडे काही तंत्रज कमी आहेत. काही रुग्णालयात विशेष तज्ञ डॉक्टर नाही आहेत, हे सगळ देण्याची व्यवस्था केली आहे. वेंगुर्ला येथे जी मेडिकल कॉटर आहे ती पाडून तिथे डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी नर्स यांना एकत्रित इमारत बांधण्यात येणार आहे. यावर तात्काळ कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही केसरकर यांनी सांगितले. डॉक्टर भरतीला उशीर झाला होता व काही थेट भरत्या करायच्या आहेत, त्याला सुद्धा आरोग्यमंत्र्यांनी परवानगी दिली असून काही डॉक्टरांची बिले द्यायची होती, त्या संदर्भातही आरोग्यमंत्र्यानी आदेश दिले आहेत. येत्या दोन महिन्यात सगळं व्यवस्थित होईल, असे केसरकर म्हणाले.
