क्रिएटिव्ह सखी ग्रुपकडून महीलासाठी अविष्कार तारकांचा कार्यक्रमाचे आयोजन

⚡बांदा ता.१२-: चार वर्षाच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर क्रिएटिव्ह सखी ग्रुप बांदा या संस्थेच्या वतीने खास विवाहित महिलांसाठी ‘अविष्कार तारकांचा’ या कार्यक्रमाचे आयोजन १३ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ७ वाजता येथील विठ्ठल रखुमाई मंगल कार्यालयात करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण राहिलेली सौभाग्यवती सौंदर्य स्पर्धा घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर खास विवाहित महिलांसाठी ग्रुप डान्स स्पर्धा घेण्यात येईल. मंडळाचे हे दशकपूर्ती वर्ष असल्यामुळे यावेळी सर्व कार्यक्रम भव्य स्वरुपात करण्याचा मंडळाचा मानस आहे. एक वेगळ आकर्षण म्हणून खास आई आणि मुलांसाठी म्हणून ‘मॉम्स अँड चाइल्ड’ ही स्पर्धा घेण्यात येणार आहे.
यावेळी या कार्यक्रमाचे स्वरूप हे सिंधुदुर्ग आणि गोवा राज्यापुरते मर्यादित न ठेवता इतर राज्यांसाठी पण खुले करण्यात आले आहे. सौभाग्यवती सौंदर्य स्पर्धे साठी पारितोषिके, प्रत्येकी प्रथम क्रमांक रुपये दहा हजार व क्राऊन, द्वितीय क्रमांक रुपये 7000, तृतीय क्रमांक रुपये पाच हजार. मॉम्स अँड चाइल्ड स्पर्धा पारितोषिके प्रथा रुपये 2500 व ट्रॉफी, द्वितीय क्रमांक रुपये 2000 व तृतीय क्रमांक रुपये दीड हजार. महिलांसाठी ग्रुप डान्स स्पर्धा पारितोषिके, प्रथम क्रमांक रुपये 3000 व ट्रॉफी, द्वितीय क्रमांक रुपये 2000 व ट्रॉफी, तृतीय क्रमांक रुपये दीड हजार व ट्रॉफी. ही स्पर्धा 13 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी सात वाजता, विठ्ठल रखुमाई हॉल, गांधी चौक ,बांदा येथे आयोजित केली गेली आहे. इच्छुक स्पर्धकांनी आपली नावे दिनांक 25 डिसेंबर पर्यंत खालील नंबर वर द्यावीत.
अधिक माहितीसाठी 9421148814,9923869205,9422079515,9421036184,9404497292 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page