काजू पीक संरक्षण मोहिम अंतर्गत आयोजन:शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन…
बांदा ता.१२-: डेगवे येथे काजू व कोको बोर्ड कोचीन , प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला आणि कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने काजू पीक संरक्षण मोहिमे अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण वर्गाला शेतकऱ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
या प्रशिक्षणास कीटक शास्त्रज्ञ डॉ. विजयकुमार सीताराम देसाई, कनिष्ठ उद्यानविद्यावेत्ता डॉ. एम. पी. सणस, कनिष्ठ काजू पैदासकार एल. एस. खापरे,
डॉ. गोपाळ गोळवणकर संशोधन सहयोगी हॉर्टसप आंबा हे शास्त्रज्ञ आणि कृषी विभागाचे श्री भुईम्बर, प्रकाश घाडगे ,श्री निकम, अतुल माळी यांनी शेतकऱ्यांना विविध विषयांवर सकाळच्या सत्रात मार्गदर्शन केले.
त्यानंतर दुपारी काजू बागेमध्ये पीक संरक्षण विषयी प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. रब्बी हंगामात होणाऱ्या मिरची पिकावरील चुरडा मुरडा नियंत्रणाबाबत आणि गादीवाफ्यावरील भुईमूग लागवड बाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. सदर प्रशिक्षणाचे व क्षेत्रीय स्तरावरचे संपुर्ण नियोजन डेगवे कृषी सहाय्यक अतुल माळी व डेगवे येथील प्रगतशील शेतकरी आबा देसाई यांनी केले.
सदर कार्यक्रमाला सरपंच राजन देसाई, प्रगतिशील शेतकरी आबा देसाई, चंद्रशेखर देसाई, नाना देसाई, आत्मा बीटीएम मिनल परब आणि डेगवे व पडवे माजगाव गावातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.
