मालवण येथील लोकअदालतीत २०८ प्रकरणे तडजोडीने निकाली…

⚡मालवण ता.१२-: मालवण येथील दिवाणी न्यायालय येथे राष्ट्रीय अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मालवण येथील दिवाणी व सहदिवाणी न्यायालयातील ४३१ प्रलंबित प्रकरणे व वादपूर्व एकूण १५१५ प्रकरणे अशी एकूण १९४६ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी प्रलंबितपैकी ८ प्रकरणे व वादपूर्व प्रकरणांतील १९४ प्रकरणे तसेच पोलिसांकडील वाहतूक शाखेकडील ई-चलन ६ प्रकरणे अशी मिळून २०८ प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात आली. यात प्रलंबित, वादपूर्व व ई-चलनमधील एकूण ३ लाख १२ हजार ९८९ रुपये वसुली करण्यात आली.

या लोकन्यायालयात तालुक्यातील राष्टीयकृत बँका, ग्रामपंचायत, वीज वितरण कंपनी तसेच वाहतूक पोलिसांमार्फत ई-चलन प्रकरणे अशी वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. या लोकन्यायालयासाठी एक पॅनेल बनविण्यात आले होते. पॅनेलप्रमुख म्हणून दिवाणी न्यायाधीश तथा मालवण तालुक विधी सेवा समितीचे अध्यक्ष ए. डी. तिडके, विधीज्ञ श्रीमती एस. एस. कांबळे यांनी पॅनेल सदस्य म्हणून काम पाहिले. तसेच न्यायालयाचे कर्मचारी सहाय्यक अधीक्षक एस. एन. पालव, लघुलेखक श्रीमती आर. पी. मुणनकर, वरिष्ठ लिपीक ए. ए. चव्हाण, यू एन. मालवणकर, कनिष्ठ लिपीक एस. व्ही. परब, एल. आर. कांबळी, श्रीमती एस. व्ही. जाधव, सी. एम. गोसावी, एस. व्ही. कामतेकर, पी. ए. तारी यांचे सहकार्य लाभले.

You cannot copy content of this page