चितराळी व जुना बाजार येथील बंदिस्त गटाराच्या कामाचा शुभारंभ…

सुधीर आडिवरेकर यांच्या हस्ते शुभारंभ: पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून निधी मंजूर..

सावंतवाडी ता.१२-: सावंतवाडी शहरातील प्रभाक ३ व प्रभाक क्र ५ येथील बंदिस्त गटार कामाचा शुभारंभ आज माजी नगरसेवक सुधीर आडिवरेकर यांच्या यांच्या हस्ते झाले.मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या निधीतून हे काम होत असून यासाठी १८ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.सावंतवाडी नगर परिषदेच्या माध्यमातून या कामाचा शुभारंभ आज करण्यात आला आहे.

यावेळी माजी नगरसेवक मनोज नाईक शुभांगी सुकी, मेघना साळगावकर, वैभव तनावडे, राजू चितारी, शर्वरी धारगळकर, महेश म्हापसेकर, धीरेंद्र म्हापसेकर व स्थानिक नागरिक यावेळी उपस्थित होते.

शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मंत्री रविंद्र चव्हाण हे कटिबद्ध असून रस्ते पाणी सुविधा निर्माण करू असे आश्वासन माजी नगरसेवक सुधीर आडिवरेकर व माजी नगरसेवक आनंद नेवगी यांनी दिले.

You cannot copy content of this page