इंडियन ऑइल पुरस्कृत जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धा १६, १७ रोजी…

⚡मालवण ता.१२-: इंडियन ऑइल पुरस्कृत आणि मालवण टेबल टेनिस अकॅडमी आयोजित जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धा दि. १६ आणि १७ डिसेंबर रोजी जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूल मालवणच्या श्रीमती ‘सुलोचना श्रीपाद पाटील मेमोरियल हॉल’ मध्ये होणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील टेबल टेनिस खेळाडूंना संधी मिळावी आणि टेबल टेनिस खेळाचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी इंडियन ऑइलच्या सहकार्याने ही स्पर्धा मालवण मध्ये दरवर्षी आयोजित केली जाते आणि जिल्ह्यांमध्ये अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते. या वर्षी प्रथमच टीम लीग पद्धतीने ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. शिवाय महिला/पुरुष एकेरी आणि दुहेरी तसेच १५ वर्षांखालील मुला-मुलींच्या गटात खेळविली जाणार आहे. तसेच शिकाऊ मुला मुलींच्या गटात सुद्धा खेळविली जाणार आहे. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी श्री.विष्णू कोरगांवकर (९४२१२३६४४६ /८०८०२४८२०२) यांच्याशी दि. १४ डिसेंबर पूर्वी नाव नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page