श्री भगवती देवी ब्राह्मणदेवाचा वार्षिक जत्रोत्सव 13 रोजी…

⚡वैभववाडी ता.११-: नावळे गावचे ग्रामदैवत श्री भगवती देवी ब्राह्मणदेवाचा वार्षिक जत्रोत्सव बुधवार दिनांक 13 डिसेंबर 2023 देव दिपवाळीच्या दिवशी संपन्न होत आहे.
दर वर्षी प्रमाणे बुधवारी सकाळी भगवती देवी मंदिरात देवीची पूजाअर्चा करून पालखी सजवून दुपारी पालखी बाहेर निघते रामेश्वर देवाची भेट घेऊन पालखी ब्राह्मण देवाचे भेटीला जाते पालखी ब्राह्मण देव मंदिरात गेल्यानंतर गावातील सर्व मंडळींचे व माहेरवासणी, पावणे मंडळींचे व शेजारील गावातील लोकांची रखवालीचे नारळ ठेवले जातात नंतर रात्री पालखी ब्राह्मण देव मंदिराकडून श्री भगवती मंदिराकडे येते त्यानंतर ओटी भरण्याचा कार्यक्रम पहाटे पर्यंत सुरू असतो पालखी मंदिरात आल्यानंतर मनोरंजनाचा कार्यक्रमासाठी आमने सामने डंबलबारी भजनाचा बुवा संदिप कदम विरूद्ध बुवा अभिषेक शिरसाट यांच्यात जंगी सामना होणार आहे तरी याचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन नावळे ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page