औद्योगिक सहकारी संस्थेसाठी चुरशीचे मतदान…

राणी पार्वतीदेवी हायस्कूलमध्ये सुरू आहे मतदान

⚡सावंतवाडी ता.१०-: सावंतवाडी तालुका विविध औद्योगिक सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी चुरशीने मतदान सुरू आहे . राणी पार्वतीदेवी हायस्कूल येथे निवडणूक होत आहे.

मतदान संपल्यानंतर निवडणूक निकाल जाहीर करण्यात येणार आहे या संस्थेच्या निवडणुकीसाठी चार जागा अगोदरच बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामध्ये सुप्रिया सुभाष नाईक ,मोहिनी रंजन गवस, मुकुंद मेस्त्री, लीलावती ज्ञानेश्वर जाधव अशा बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांचा समावेश आहे.

निवडणूक दोन जागांसाठी होत आहे परंतु खुल्या प्रवर्गासाठी सात जागा असल्यामुळे सात उमेदवार निवडून येणार आहेत विद्यमान चेअरमन सुरेश केशव सावंत निवडणूक रिंगणात आहेत. यावेळी उबाठा सेनेचे चंद्रकांत कासार आबा सावंत गुणाजी गावडे तसेच संजय कानसे, गजा सावंत, जितु गावकर उपस्थित होते.

You cannot copy content of this page