*💫देवगड दि.१४-:* घरगुती कारणावरून काकावर चाकूने हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी नाडण पोखरबांव येथील सोनू जनार्दन खरात(३३) याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.ही घटना १४ मार्च रोजी दुपारी १२ वा.सुमारास नाडण पोखरबांव येथे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, नाडण पोखरबांव येथील गंगाराम लक्ष्मण खरात(५०) यांना त्यांच्या राहत्या घराच्या अंगणात त्यांचा पुतण्या सोनू जनार्दन खरात यांनी घरगुती कारणावरून त्याचा हातातील सुरीने गंगाराम खरात यांच्या डाव्या हाताच्या मनगटावर वार केला व शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली अशी तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी सोनू खरात याच्याविरूध्द भादवि कलम ४५१, ३२४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.तपास पो.हे.कॉ.शैलेंद्र कांबळे करीत आहेत.
*काकावर चाकूने हल्ला केल्याप्रकरणी पुतण्यावर गुन्हा दाखल
