*💫मालवण दि.१४-:* शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसा निमित्त मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम सोमवार १५ मार्च रोजी मालवण शहर व तालुक्यात राबवले जाणार आहेत. अशी माहिती तालुकाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर यांनी दिली. मालवण शहरात विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. तसेच तालुक्यात सहा जिप मतदारसंघातही सामाजिक कार्यक्रम राबवले जाणार आहेत. १५ व १६ मार्च दोन दिवस कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोना खबरदारी नियमांचे पालन करून खासदार विनायक राऊत यांचा वाढदिवस साजरा होणार असल्याचे खोबरेकर यांनी सांगितले.
खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त मालवणात विविध सामाजिक उपक्रम…
