⚡सावंतवाडी,ता.०९-:
रत्नागिरी-खेड येथील एका विवाहित महिलेने भाड्याच्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास सबनीसवाडा येथे घडली. चैत्राली निलेश मेस्त्री (वय ३२)असे तिचे नाव आहे. याबाबतची माहिती मिळतात घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. अधिक तपास सुरू आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित महिला ही मुळची खेड येथील आहे. ती आपला दिर संदेश यांच्या समवेत सबनीसवाडा येथे एका भाड्याच्या घरात राहत होती. आज दुपारी तिने ओढणीच्या साह्याने गळफास लावून घेतला. हा प्रकार दिराच्या लक्षात आल्यानंतर त्याने ओढणी सोडण्याचा प्रयत्न केला. परंतु गाठ सुटली नाही त्यामुळे आग लावून ओढणी जाळली व तिचा मृतदेह खाली उतरला. परंतु तत्पूर्वी तिचे निधन झाले होते. याबाबतची माहिती त्याने ११२ नंबरच्या माध्यमातून पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत, अधिक तपास सुरू आहे. तिने आत्महत्या नेमकी काय केली? याबाबत प्रश्नचिन्ह आहे. तिचा पती हा पुणे येथे राहत आहे. तो मोठ्या प्रमाणात दारू पिऊन त्रास देत असल्यामुळे त्याला कंटाळून ती आपल्या दिरा समवेत या ठिकाणी आली होती. तिच्या पश्चात तीन मुले आहेत. त्यातील एक मुलगा हा तिच्या समवेत व अन्य दोघेजण वडिलांच्या समवेत राहतात अशी माहिती सावंतवाडी पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी दिली. दरम्यान याबाबतची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले, उपनिरिक्षक गजानन भालेराव, आनंद यशवंते, पोलीस हवालदार प्रसाद कदम, रामदास जाधव, संतोष गलोले आदींनी त्या ठिकाणी धाव घेतली.