⚡मालवण ता.०९-: भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त फुले, शाहू, आंबेडकर विचारमंच मालवण यांच्यावतीने मालवण शहरातून भीम ज्योत रॅली काढण्यात आली. या रॅलीत धम्म बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मालवण बांगीवाडा येथील डॉ. आंबेडकर पुतळा येथे या रॅलीची सांगता झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी रात्री भीमगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत माजी गटविकास अधिकारी मिलिंद जाधव, नितीन वाळके, सिध्दार्थ जाधव, संजय जाधव, आनंद मालवणकर, बबन मालवणकर, प्रा. कैलास राबते, अशोक मोरे, रंजन तांबे, रवींद्र मालवणकर, विलास वळंजू, पुरुषोत्तम मालवणकर, दर्शना गुळवे, नेहा तांबे, विलास देउलकर, दिपक जाधव, संग्राम कासले, अॅड. सुमित जाधव, संतोष मालवणकर, अक्षय मालवणकर तसेच मालवणकर शहरातील धम्मबांधव सहभागी झाले होते.