राष्ट्रवादी सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्षपदी दिवाकर मुरकर

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत,अनंत पिळणकर यांनी केले स्वागत.

⚡कणकवली ता.०९-: कणकवली नगरपंचायतीचे माजी नगरसेवक दिवाकर मुरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या हस्ते, तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्षपदी दिवाकर मुरकर यांची नियुक्ती करण्यात आली.

यावेळी प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर, जिल्हा सरचिटणीस भास्कर परब, वैभववाडी तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण, अल्पसंख्याक सेल कार्याध्यक्ष नजीर शेख, रुपेश जाधव, समीर आचरेकर, देवेंद्र पिळणकर, सागर वारंग, अविनाश चव्हाण, बबलू गावडे, बाळा पवार, शंकर चिंदरकर, सुजल शेलार आदी उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दिवाकर मुरकर यांची सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्षपदी यांची नियुक्ती जाहीर केली. मुरकर यांच्यासारखे सुशिक्षित आणि अभ्यासू व्यक्तीमत्व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाल्यामुळे पक्ष संघटनेला आणखी बळकटी मिळेल असे प्रतिपादन अमित सामंत यांनी केले. मुरकर याना उपजिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती चे पत्र जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या हस्ते देण्यात आले.
पक्षप्रवेश केल्यानंतर कणकवली महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्रा.
दिवाकर मुरकर म्हणाले की ,मी 1999 साली पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यानंतर आम्ही पक्षात प्रवेश केला होता. बदलत्या राजकाणात शरद पवार यांच्या सारख्या आदर्श नेत्याचा विचारच राज्याला आणि देशाला योग्य दिशा देऊ शकतो. म्हणूनच नव्या इनिंगला सुरुवात करताना खा. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून राजकीय कारकीर्द सुरू करत आहे.

You cannot copy content of this page