संजय पडते:नेहमीच आयत्या बिळावर बसणाऱ्या भाजपच्या भंपकांनी फुकाचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करु नये..
⚡कुडाळ ता.०८-: खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून चिपी गावातील मंजूर टॉवरचे भूमिपूजन खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेना उपनेते तथा जिल्ह्याचे संपर्कप्रमुख अरुण भाई दुधवडकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री संजय पडते यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांनी उद्घाटन करण्याचा प्रयत्न करून फुकाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला यावरून जोरदार प्रतिक्रिया देत लोकांच्या मागणीनुसार सदर टॉवर मंजूर करून घेण्यासाठी खासदार विनायक राऊत यांनी वेळोवेळी संसदेत आवाज उठविला व लोकांची होणारी गैरसोईबाबत वस्तूस्थिती कथन करत मागणी लावून धरली आणि मंजुरी घेत बीएसएनएलच्या अधिकारी वर्गाशी समन्वय साधत सदर टॉवर संदर्भात सर्व प्रकारच्या कागदोपत्री प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यासाठी सूचना केल्या. तसेच प्रत्यक्षात टॉवरचे कामाला आता सुरुवात होणार आहे म्हटल्यावर आणि खासदार विनायक राऊत उद्घाटन करायला येतात हे समजल्यावर आता भाजपवाले आयत्या बिळात शिरण्याचा प्रयत्न करून भंपकपणे फुकाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
स्वतःच्या पक्षाचे मंत्री असलेल्या नेत्यांकडून निधी मंजूर करून आणावा आणि मग नारळ फोडण्याचे काम करावे असे आवाहन करत वेंगुर्ला तालुक्यात खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून २३ टॉवर मंजूर झाले असल्याची माहिती संजय पडते यांनी दिली.
यावेळी शिवसेना उपनेत्या तथा महिला जिल्हा संघटक जान्हवी सावंत, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ संपर्क प्रमुख शैलेश परब, जिल्हा समन्वयक बाळा गावडे, तालुकाप्रमुख बाळू परब, महिला तालुका संघटक सुकन्या नरसुले, उपतालुकाप्रमुख मनोहर येरम, उपजिल्हाप्रमुख संदेश निकम, शहरप्रमुख अजित राऊळ, अजय सारंग, सुनाद राऊळ, अभय परूळेकर, बीएसएनएलचे अधिकारी शशांक श्रीवास्तव आणि शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते व शिवसैनिक ग्रामस्थ उपस्थित होते.