मालवणातील प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सौरभ ताम्हणकर यांच्या हस्ते सन्मान…

⚡मालवण ता.०८-: तारकर्ली किनारपट्टीवरील भारतीय नौसेना दिन सोहळा तसेच राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गेले अनेक दिवस मेहनत घेत असलेल्या प्रशासनाच्या सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सामाजिक कार्यकर्ते सौरभ ताम्हणकर यांनी आभार मानले.


राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण व नौदल दिन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नुकताच झाला. हे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडावेत यासाठी पालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे व पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे व सहकाऱ्यांचे चांगले योगदान राहिले. याबद्दल या सर्वांचे श्री. ताम्हणकर यांनी पुष्पगुच्छ देत सन्मान केला. यावेळी फ्रान्सिस फर्नांडिस, कृष्णा सावंत, सागर धुरी, अक्षय सडविलकर, अंकित जोशी, मॉन्टी तारी आदि उपस्थित होते.

You cannot copy content of this page